विद्या ज्ञान के देवता  श्री गणपति (गणेशजी ) का उत्सव पुरे देशभर में ही नहीं बल्कि पुरे विश्व में बहुत ही धूमधाम से मनाया जाता है।  यह उत्सव प्रति वर्ष भाद्रपक्ष महिने के चतुर्थी के दिन गणेश चतुर्थी  के नाम से मनाया जाता है।  इस दिन हम सभी श्रद्धावान गणेशजी  की मूर्ति अपने घर लेकर आते हैं और पुरी श्रद्धा के साथ हम सभी गणेशजी की मूर्ति की स्थापना करते हैं और पूजा-पाठ, आरती ,भजन बहुत ही प्यार से करते हैं  और गणपति बाप्पा को  प्रसाद का भोग  चढ़ाते हैं।  नियमानुसार  पूजा के उपरांत इस मूर्ति का पुनर्मिलाप करना पड़ता है तदुपरांत सभी श्रद्धावान गणपतिबाप्पा से दिल से यह कामना करते हैं कि अगले वर्ष बाप्पा फिर से आना। इसी भाव के साथ  गणेशजी की मूर्ति का पुनर्मिलाप  करते हैं। पर इसके बाद इस मूर्ति का क्या होता है। क्या सच में गणेशजी की मूर्ति पानी में घुलमिल जाती है? 



इस विषय में क्या कोई भी विचार करता है? तब इसका जवाब "नहीं" में ही आयेगा !

फिर ऐसी परिस्थिति में शाश्वत एवं पर्यावरण के लिए सहायक सिद्ध हो सके ऐसा विकल्प क्या है? तत्काल ही यह प्रश्न उठ खड़ा होता है?
इस प्रश्न  का एक ही जवाब है 'इको फ्रेंडली गणेश मूर्ति!
विद्यांचा अधिपती व बुद्धिदाता म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘श्रीगणेशा’चा जन्मोत्सव अर्थात गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव! भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीस आपण मनोभावे गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो. त्याची श्रद्धेने पूजा करतो. आरती, भजन, पूजन, प्रसाद, नैवेद्य अशा अनेक तर्‍हेने बाप्पाला साद घालतो आणि पूनर्मिलापाची वेळ येते तेव्हा मनात  बाप्पाचं मनोहारी रूप साठवून जड अंत:करणाने निरोप देऊन पूनर्मिलाप करतो. पण पूनर्मिलाप केल्यानंतरची परिस्थिती काय असते? ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळते का? 



याचं उत्तर नाही, असंच येईल!

मग, अशा स्थितीत शाश्‍वत व पर्यावरणास सहाय्य ठरेल, असा पर्याय काय? हा प्रश्‍नही तात्काळ समोर येतो. तर मग या प्रश्‍नाचं उत्तर आहे, ‘इको-फ्रेंडली गणेश’! 

आज अनेक स्तरांवरून इको-फ्रेंडली गणेश मूर्तीसाठी संस्थेला पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘Go Green Campaign' अंतर्गत तसेच ‘पर्यावरणपूरक गणपती’ बद्दल २०१० ते २०१२ अशी सलग तीन वर्षे संस्थेला प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आले.
२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच ‘मुंबई मिरर असोसिएशन, टाईम्स रेड सेल’ यांच्यामार्फत ‘टाईम्स स्पेशल हरित गणपती अ‍ॅवॉर्ड २००९’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
३) २००८ साली पवई येथे ‘निती’ (NITIE) मार्फत भरविलेल्या प्रदर्शनात मुंबईच्या महापौर श्रीमती डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या संस्थेला गौरविले.

अशा प्रकारे निष्काम, नि:स्वार्थी प्रेरणेतून चाललेल्या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सव पर्यावरण पूरकच असला पाहिजे असे आपल्या कृतीतून प्रत्यक्षरित्या दाखवून देणार्‍या श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या कार्यात भाविकांनी पुढाकार घेतल्यास होणारा पर्यावरणाचा र्‍हास नक्कीच टाळता येईल.

संस्थेतर्फे पहिल्या वर्षी २००५ साली ३३५ मूर्ती, नंतर काही वर्षे ३००० मूर्ती तर आता दरवर्षी ६००० ते ७००० मूर्ती तयार केल्या जातात. मागील वर्षी (२०१७ मध्ये) ६५०० भाविकांनी संस्थेची पर्यावरणपूरक मूर्ती पूजनास वापरली. भारतातील अनेक प्रांतात ह्या मूर्ती वापरतातच. परंतु अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच साऊथ आफ्रिका, श्रीलंका व आखाती देशांमधील भाविकांनीही या मूर्ती त्यांच्या-त्यांच्या परदेशातील घरी नेल्या व पूजन केले.